पारनेर बलात्कार-हत्या प्रकरणी तिन्ही दोषींना फाशी

- Advertisement -

महत्वाचे:
.२२ ऑगस्ट २०१४ रोजी लोणी मावळा येथे तिघांनी अल्पवयीन मुलीचा बलात्कार करुन खून केला होता.
.आरोपीविरुद्ध बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, बलात्कार, खून या कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. ३. तिघांना मृत्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात तिन्ही आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. न्यायालयाने संतोष विष्णू लोणकर (वय ३५ वर्ष), मंगेश दत्तात्रय लोणकर (वय ३० वर्ष) आणि दत्तात्रय शिंदे (वय २७ वर्ष) यांना लात्कार आणि हत्येसह सहा आरोपांमध्ये दोषी ठरवलं होतं.

- Advertisement -

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली होती. अखेर न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?
लोणी मावळा इथे २२ ऑगस्ट २०१४ रोजी संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्तात्रय शिंदे या तीन नराधमांनी शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करुन तिचा खून केला होता. या तिघांनी बाईकवरुन पाठलाग करुन मुलीला अडवलं. त्यानतंर तिच्या तोंडात कपडा कोंबून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर गुदरमल्याने तिचा मृत्यू झाला. त्याच दिवशी संध्याकाळी मुलींचा मृतदेह चारीच्या पुलाखाली आढळला होता.

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी संतोषला पारनेर पोलिसांनी अटक केली होती़. तर त्यानंतर चार दिवसांनी उर्वरित दोघा आरोपींना अटक झाली होती. पारनेर पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, बलात्कार, खून या कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी १८ नोव्हेंबर २०१४ रोजी जिल्हा न्यायालयात आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी खटला लढवला होता.

- Advertisement -