एसटी कर्मचाऱ्यांचे नेतेच टक्केवारी खातात- रावते

- Advertisement -

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर आहे, एसटी कर्मचारी संघटनेचे नेते कर्मचाऱ्यांची टक्केवारी खातात असा सनसनाटी आरोप परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलाय. या आरोपांमुळे वाद पुन्हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

एसटी कर्मचारी ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर संपावर गेले आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. दिवाकर रावते यांनी अगोदरच संपकऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची मागणी अमान्य केलीये. आता तर त्यांनी थेट संघटनेवर निशाणा साधलाय.एसटी कामगार नेते कर्मचाऱ्यांची टक्केवारी खातात  असा आरोपच रावतेंनी केलाय.

- Advertisement -

तसंच संप मागे घेतला नाही तर प्रशासन कारवाईबाबत निर्णय घेईल पण कारवाई करून कामगारांचे आयुष्य खराब करायचे नाही असे मला वाटते. कामगार नेते कर्मचाऱ्यांचे नुकसान करत आहेत, कामगारांनी त्यांच्या नादी लागू नये असा सल्लाही रावतेंनी दिला.

- Advertisement -