Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रसंत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारणीबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करावा राज्यमंत्री कु. आदिती...

संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारणीबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करावा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांचे निर्देश

State Min Aditi Tatkare Meetingमुंबई: अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठीचा प्रस्ताव शासनाकडे  त्वरीत सादर करावा, असे निर्देश फलोत्पादन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.

आज मंत्रालयात राज्यमंत्री कु. तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

विदर्भातील मुख्य फळपिक असलेले संत्र या पिकावर अवलंबून असणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी एकीकृत संत्रा उत्पादन वाढ, तंत्रज्ञान प्रक्रीया व पणन असा प्रकल्प या भागात व्हावा, असा विचार आहे त्यामुळे हा प्रकल्प उभारणीसाठी  शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल असे कुमारी तटकरे यांनी सांगितले.

यावेळी आमदार देवेद्र भुयार, कृषी आयुक्तालयाचे संचालक (फलोत्पादन)  डॉ. के.पी. मोते, संचालक एन.टी. शिसोदे, कृषी व पदुम विभागाचे सह सचिव (फलोत्पादन)  अशोक आत्राम, उद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी अनिलकुमार उगले, विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग  सुभाष नागरे, पणन विभागाचे कक्ष अधिकारी  जयंत भोईर  व या नियोजित प्रकल्पशी संबंधित शेतकरी व व्यावसायिक उपस्थित होते.

यावेळी टुली-चुरा या लहान संत्रा फळपिकावर प्रक्रीया करण्यासाठी किमान 10 एकर क्षेत्र शेतकरी उत्पादक कंपनीकडून दीर्घ मुदतीसाठी उपलब्ध करुन देणार असून, या क्षेत्रामध्ये संत्रा ज्युस कॉन्सर्टेड, संत्रा ज्युस पावडर, इथेंसियल आईल, अरोमा, ऑईल, कॅटल फीट प्रकल्प, संत्रा ग्रेडींग व व्हॅक्सींग प्रकल्प, कोल्ड चेन व स्टोरेज, रिफेन व्हॅन इ. या नियोजित प्रकल्पांतर्गत उभारण्याबाबतची माहिती उपस्थित संत्रा व्यवसायिक शेतकरी यांनी कंपनीच्यावतीने दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments