नालासोपाऱ्यातील दीराकडून वहिनीची हत्या

- Advertisement -

नालासोपारा : नालासोपाऱ्यात एका २६ वर्षीय विवाहित महिलेची कौंटुंबिक वादातून निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. महिलेच्या मोठ्या दीरानेच धारधार हत्याराने ही हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.

मृत महिला २ महिन्यांची गरोदरदेखील असल्याची माहिती समजते आहे.निखत नदिम असं मृत महिलेचं नाव आहे. दरम्यान आरोपी हत्येनंतर फरार असून सध्या पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असली तरी नेमकं हत्येचं कारण अस्पष्ट आहे. निखतचा दीर सलमान शेखने घरात घुसून निखतवर वार केले. यावेळी शेजारील महिलेने निखतला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात ती महिलादेखील जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन निखतचा मृतदेह ताब्यात घेतला. २०१४ साली निखतचा विवाह झाला होता. तिला एक मुलगीदेखील आहे.

- Advertisement -