राणेंची अवस्था भाजपनं अतिशय वाईट केली- हुसेन दलवाई

- Advertisement -

महत्वाचे…
१.राणेंना काँग्रेसमध्ये सन्मानपूर्वक घेण्यात आले होते २. भाजपाने आज राणेंनी परिस्थिती अतिशय वाईट केली ३.भाजपाने प्रवेश करुन घेतला नाही वेगळा पक्ष काढण्याचा सल्ला दिला


रत्नागिरी: काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंनी पुन्हा एकदा नारायण राणेंवर खोचक टीका केली. राणेंना काँग्रेसमध्ये सन्मानपूर्वक घेण्यात आले होते , राणेंनी सकाळी पक्ष प्रवेश केला व त्याच दिवशी त्यांचा मंत्रिमंडळात प्रवेश दिला होता, मात्र भाजपाने राणेंना  भाजपात घेऊन मंत्रिपदाचे आश्वासन दिले, मात्र पक्ष प्रवेश करून घेतला नाही, उलट वेगळा पक्ष काढण्याचा सल्ला दिला.

भाजपाने  आज राणेंनी परिस्थिती अतिशय वाईट केली आहे, राणेंची ही परिस्थिती पाहून खूप वाईट वाटतंय, काँग्रेसने कधीही राणेंवर अशी वेळ येऊ दिली नाही, असा पुनरुच्चार खासदार हुसेन दलवाई यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यान दापोली येथे केला आहे, राणे यांना हुसेन दलवाई यांनीही पूर्वी काँग्रेस सोडू नका असा सल्ला दिला होता. तसेच दलवाई यांच्याकडे काँग्रेसने विशेष जबाबदारी दिल्यानंतर आमदार नितेश राणे यांनीही दलवाई यांच्यावर जाहीर टीका केली होती. आता राणेंना भाजपाने झुलवत ठेवल्यामुळे त्यांच्यावर खोचक टीका करण्यासाठी सर्वांनाच संधी मिळाली आहे.

- Advertisement -
- Advertisement -