समाजात भगव्या रंगाचा आधार घेऊन दहशत माजवण्याचे काम – कन्हैया

- Advertisement -

कोल्हापूर: आज आपल्या समाजात भगव्या रंगाची मदत घेऊन दहशतवाद पसरवला जातोय. अशी घाणाघाती टीका जेएनयुआयचा माजी विघार्थी नेता कन्हैया कुमार याने केली. तसेच आपण निवडणूक लढवणार नाही. असा उल्लेख कोल्हापूरमध्ये आयोजित सभेत केला.

जेएनयूच्या प्रकरणानंतर चर्चेत आलेला कन्हैया कुमार निवडणूक लढवणार का याबद्दल चर्चा चालू होत्या. आज आपल्या समाजात भगव्या रंगाची मदता घेऊन दहशतवाद पसरवला जातोय अशी टीकाही कुमार यांनी केली. ‘आज समाजात भगव्या रंगाचा आधार घेऊन दहशत माजवत आहेत. पण भगवा रंग हा त्याग आणि बलिदानाचं प्रतिक आहे..तसंच हा रंग छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजीमहाजारांचा आणि संत तुकारामांचा आहे’.

आज कोल्हापूरमध्ये विद्यार्थी संघटनांच्या वतीनं कन्हैया कुमारची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनूी टीका केली आहे. कोल्हापूर पोलिसांनी सशर्त सभेला परवानगी देऊनही आज कोल्हापूरच्या सभास्थळी हिंदूत्ववादी संघटनांनी कन्हैयाच्या विरोधात घोषणाबाजी करत सभेला विरोध केला. पण पोलिसांनी परिस्थिती सांभाळत सभा शांततेत पार पडली. आपल्या भाषणात कन्हैयानं केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. कोल्हापूर ही क्रांतीची भूमी आहे. कोल्हापूरला कॉ. गोविंद पानसरेंचा वारसा आहे त्यामुळं इथून क्रांतीची सुरुवात व्हावी असं आवाहनही कन्हैयाने केलं. कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये ही सभा पार पडली. कॉ. पानसरेंच्या पत्नी उमा पानसरे या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. दरम्यान कन्हैयानं पानसरेंच्या घरीही भेट दिली तसंच कोल्हापूरमधल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं.

- Advertisement -
- Advertisement -