जळगावात पाठिमागून येणाऱ्या टँकरच्या धडकेत मातेसह तीन मुले ठार

- Advertisement -

महत्वाचे…
१.भरधाव टँकरने पाठीमागून दिली धडक २. रस्त्याने पायी जात असलेले आई आणि तिची तीन मुले जागीच ठार ३.आज सकाळी १०.३० वाजता मुक्ताईनगरनजीक घडली घटना


जळगाव- भरधाव टँकरने पाठीमागून धडक दिल्याने रस्त्याने पायी जात असलेले आई आणि तिची तीन मुले जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजता मुक्ताईनगरनजीक घडली. तर एक जण जखमी झाला. निम्मीबाई गोधन पवार (३८) आणि तिची मुले अल्कोश गोधन पवार (८ वर्ष), अमरचंद पवार (१३ महिने) आणि मुलगी उडदीया गोधन पवार (६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

गोधन पवार हा आपल्या कुटुंबातील ७ सदस्यांसह रूद्राक्ष विक्रीसाठी घोडसगाव येथून चिखलीकडे जात होता. त्याचवेळी मुक्ताईनगरहून मलकापूरकडे जाणाऱ्या टँकरने (एमएच०६-एक्यू ९९७) पायी जाणाऱ्या पवार कुटुंबाला जोरदार धडक दिली. यात वरील चारही जण ठार झाले. तर निहाल गोधन पवार (१२ वर्ष) हा गंभीर जखमी झाला. या अपघातातून गोधन व नेहा बाई हे दोघे बचावले.

- Advertisement -