मामाकडून तीन अल्पवयीन भाच्यांवर बलात्कार!

- Advertisement -

महत्वाचे…
१.अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार लातुरात २.मामाने नात्याला काळीमा फासल्याने सर्वत्र संताप ३. तिन्ही भाच्या अल्पवयीन ४. आरोपी मामाला पोलिसांनी केली अटक


लातूर : मामानेच तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करुन मामा भाचीच्या नात्याला काळीमा फासल्याची संताजनक घटना लातुरात समोर आली. पीडित मुली या आपल्या आईसोबत राहतात, मामानेच तीनही अल्पवयीन भाच्यांवर शारीरिक संबंध ठेवले मात्र एका भाचीने वेदना असह्य झाल्यामुळे हा कारणामा समोर आणला यामुळे लातूरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

लातूर शहरात या तीनही मुली आपल्या आईसोबत राहतात. आरोपीनं मामाने सतरा, चौदा आणि अकरा वर्षांच्या या तीनही भाचींसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र सततच्या अत्याचाराला कंटाळून सतरा वर्षांच्या भाचीनं गांधी चौक पोलिस स्टेशन गाठलं आणि या प्रकाराचा उलगडा झाला.

पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपी मामा नराधमाला अटक केली आहे. तीनही मुलींची वैद्यकीय तपासणी सुरु असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढचा तपास केला जाणार आहे. आरोपीवर कलम ३७६ (२)(n )कलम ४ ,६ ,८ अंतर्गत पॉक्सो लावण्यात आला आहे . लातूरसारख्या शहरात नात्यातील इसमानेच अशाप्रकारे तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यानं सर्वच जण हादरुन गेले आहेत.

- Advertisement -