Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रअमरावतीत अपघातात तिघे ठार

अमरावतीत अपघातात तिघे ठार

अमरावती: शहरात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याने दिवाळी सणाच्या उत्साहावर विरजण पडले. कोंडेश्वर मार्गावर चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य, तर ट्रान्सपोर्ट नगरात ट्रकखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू झाला. संगीता लांजेवार (४०) व चंदू लांजेवार (४५, दोन्ही रा. सातरगाव) या दाम्पत्यासह कय्युम खां समद खां (६५,रा.आझाद कॉलनी) अशी मृतांची नावे आहेत.

या अपघातात दुचाकीवरील लांजेवार दाम्पत्यांचा मुलगा साहिल व चारचाकीतील राहुल जीवन गिरी (४०), साहिल राहुल गिरी (६), दक्ष राहुल गिरी (५) व श्रेयस रवींद्र गिरी (८,सर्व रा. गिरीराज कॉलनी, बडनेरा) गंभीर जखमी झाले. कय्युम खां समद खां (६५) सोमवारी सकाळी जमील कॉलनीतून पायी जात होते. दरम्यान गाडगेनगर हद्दीतील ट्रान्सपोर्टनगरात उभा असलेला एमएच २८ बी-८०८९ क्रमांकाचा ट्रक मागे वळण घेत असताना कय्युम खां ट्रकच्या मागील चाकात चिरडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी ट्रकचालक ज्ञानेश्वर आनंद धोटे (३०,रा महेंद्र कॉलनी) याला अटक करून ट्रक जप्त केला. बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील चक्रधर पेट्रोलपंपानजीक चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्यांचा मृत्यू झाला, चार लहान मुले गंभीर जखमी झाले. सातरगावातील रहिवासी चंदू लांजेवार, त्यांची पत्नी संगीता लांजेरावर व मुलगा साहिल लांजेवार हे तिघेही सोमवारी सायंकाळी दुचाकीने बडनेराकडून सातरगावाकडे जात होते. दरम्यान मागून येणाºया भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील लांजेवार दाम्पत्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा साहिल व कारमधील गिरी कुटुंबातील चारजण जखमी झाले. माहितीवरून पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई विशाल भोसले व अशफाक यांनी घटनास्थळ गाठून जखमींना तत्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालया आणले.

अनधिकृत पार्किंगचा बळी-
ट्रान्सपोर्टनगरात ट्रकचालक रस्त्यावरच अनधिकृत ट्रक पार्किंग होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनधिकृत पार्किंगमुळे कय्युम खां यांचा बळी गेला. यासंदर्भात मध्यंतरी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यावेळी पोलिसांनी थातुरमातूर कारवाई  केल्याने पुन्हा ट्रान्सपोर्टनगरात रस्त्यावर ट्रकचालकांची मनमानी वाढली आहे. कोंडेश्वरजवळील एक्सप्रेस हाय-वेवर भरधाव वाहनांची वर्दळ वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments