Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रदहावी - बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

दहावी – बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

timetable for hsc and ssc exams announced maharashtra
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी तसेच १२ वीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा मंगळवार दिनांक ३ मार्च २०२० ते सोमवार, दिनांक २३ मार्च २०२० या कालावधीत घेण्यात येणार आहे. इयत्ता १२ वीची लेखी परीक्षा मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२० ते बुधवार दिनांक १८ मार्च २०२० या कालावधीत घेण्यात येणार आहे.

या बरोबरच, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळांना तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल असे शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.

शिक्षण मंडळाचे हे अंतिम वेळापत्रक पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा ९ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांसाठी आहे. हे वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक १० ऑक्टोबर २०१९ पासून उपलब्ध असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.

परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाने छापील स्वरुपात दिलेली वेळापत्रकेच अंतिम असतील. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळांवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले, तसेच व्हॉट्सअॅपवर किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरले जाऊ नये असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments