Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रमालाड कार टोईंगप्रकरणाचा आज अहवाल

मालाड कार टोईंगप्रकरणाचा आज अहवाल

महत्वाचे…
१.तीन दिवसांपासून सोशल मिडियावर चर्चेचा विषय २. पोलीस उपायुक्त काय अहवाल सादर करतात याकडे लक्ष ३. पोलिसांचा एक व्हिडीओ शनिवारी सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ


मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या मालाडमधील मुंबई वाहतूक पोलिसांच्या टोईंगप्रकरणी अखेर सोमवारी सायंकाळपर्यंत अहवाल येणार होता. याप्रकरणी वाहतूक शाखेचे उपायुक्त चौकशी करत असून टोईंग करणार्‍या वाहतूक पोलीस हवालदार शशांक राणे यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र यानंतर आणखी काही खळबळजनक व्हीडीओ समोर आल्याने पोलीस उपायुक्त काय अहवाल सादर करतात याकडे सर्व पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.

मुलाला स्तनपान करत असलेल्या एका महिलेची गाडी टो करुन नेत असल्याचा वाहतूक  पोलिसांचा एक व्हिडीओ शनिवारी सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र या प्रकाराची चौकशी सुरू होताच अनधिकृत रित्या पार्कींग केलेल्या कारच्या फोटोसह कार टोईंग करण्यापूर्वी बाळ गाडीच्या बाहेर होते. या महिलेचा पती बाळाला तिच्याकडे देताना आणि गाडीतून उतरण्याची पोलिसांची विनंती ही महिला झुगारून लावत पोलिसांशीच हुज्जत घालत असल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला.

या घटनेत आईने सात महिन्याच्या बाळाचा जीव धोक्यात घातला असून तिच्या या बेजबाबदारपणामुळे तिच्यावर कारवाई व्हावी, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी व्यक्त केले, तर महिला जबरदस्तीने बाळासह गाडीत बसली होती, तरी पोलिसांनी तिचा आणि बाळाचा जीव धोक्यात घालायला नको होता. पोलिसांनी हे प्रकरण समजुतीने हाताळायला हवे होते, असे पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments