Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढेंची वर्णी

पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढेंची वर्णी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्ष विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडील पदभार तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपविला आहे. पीएमपीएमएनएलबरोबरच प्राधिकरण अध्यक्षपदाचीही जबाबदारी मुंढे यांच्यावर असणार आहे. अध्यक्षपदाचीही जबाबदारी गुरुवारी स्वीकारणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील सामान्य, कष्टकरी माणसाला घरकुल मिळावे, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना १४ मार्च १९७२ मध्ये झाली. गेल्या काही वर्षांत ही संस्था मूळ उद्धेशापासून भरकटली आहे. या संस्थेवर लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय राजवटीमुळे प्राधिकरणाचे नुकसान झाले आहे. आजपर्यंतच्या कालखंडात प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे प्रशासकीय अधिकाºयांच्या ताब्यात राहिलेली आहेत.

बी. टी. तालीम, डॉ. व्ही. एम. दांडेकर, नारायण वैद्य, प्रकाश केदारी, मामासाहेब पिंपळे, अगस्ती कानेटकर, बाबासाहेब तापकीर हे अशासकीय अध्यक्ष झाले. एकूण तीस अध्यक्षांपैकी सात अध्यक्ष हे अशासकीय होते. तर अन्य अध्यक्ष हे शासकीय पातळीवरून निवडले गेले. तत्कालीन सांस्कतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी २००१ ते २००४ या कालखंडासाठी बाबासाहेब तापकीर यांची निवड केली होती. मोरे यांचे निधन झाल्यानंतर पुन्हा या संस्थेवर लोकप्रतिनिधीची निवड झाली नाही. त्यानंतर आयएएस दर्जाच्या अधिकाºयांकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. २००४ पासून विभागीय आयुक्त दिलीप बंड, डॉ. नितीन करीर, प्रभाकर देशमुख, विकास देशमुख, एस. चोक्कलिंगम् आणि सध्या चंद्रकांत दळवी यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी होती. दळवी यांच्याकडील जबाबदारी काढून घेऊन मुंढे यांच्याकडे सोपविली आहे. आजच अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments