Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रमतदान केंद्र, स्ट्राँगरुम परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवा : राष्ट्रवादी काँग्रेस

मतदान केंद्र, स्ट्राँगरुम परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवा : राष्ट्रवादी काँग्रेस

NCP
महाराष्ट्र, हरियाणा या दोन राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. ईव्हीएम बाबत संशय असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहीले. व्हीएम आणि व्हीव्हीपॅटमशीन हॅक होण्याचा धोका असल्याने मतदानाच्या दिवसापासून मतमोजणीपर्यंत राज्यातील सर्व मतदान केंद्रे आणि स्ट्राँगरुमच्या ३ किमी परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात यावी मागणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या नावाने यासंदर्भातील रविवारी, २० ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. या पत्रात म्हटले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही भारतातील एक महत्वाची निवडणूक असून या निवडणुकीत सुमारे ८ कोटींपेक्षा अधिक मतदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीत मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपकरणांच्या माध्यमातून होत आहे.

मात्र, राज्यातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर संशय आहे की, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हॅक होऊन इच्छा नसलेल्या उमेदवारांनाच मते जाऊ शकतात. मोबाईल इंटरनेच्या माध्यमांतून प्रोफेशनल्स हॅकर्सकडून अशा प्रकारे हॅकिंग होणे शक्य आहे. त्यामुळे अशा प्रकारची गुन्हेगारी कृत्ये टाळण्यासाठी मतदानाचा दिवस २१ ऑक्टोबर ते मतमोजणीचा दिवस २४ ऑक्टोबर या चार दिवसांच्या काळात मतदान केंद्रे आणि स्ट्राँगरुमच्या ३ किमी परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात यावी. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्येही मतदानाच्या काळात याच पद्धतीने इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात यावी अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments