Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रदोन दिवसांचा चोरीला गेलेला बाळ पाच तासात मिळाला!

दोन दिवसांचा चोरीला गेलेला बाळ पाच तासात मिळाला!

यवतमाळ:  यवतमाळ जिल्ह्यातील वणी ग्रामीण रुग्णालयातून नवजात बाळाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, बाळाला सुखरुप त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळेच असे प्रकार घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

अधिकमाहिती अशी की, वणी येथे रजानगर हिंगणघाट येथील नुसरत अब्दुल सत्तार ही महिला प्रसुतीसाठी वणीतील रुग्णालयात दाखल झाली होती. रविवारी तिने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास रुग्णालयातूनच तिच्या बाळाचे अपहरण करण्यात आले. सर्व झोपेत असताना हा प्रकार घडला. नुसरतला जाग आल्यानंतर तिने रुग्णालयात आरडाओरडा सुरु केला. बाळाची शोधाशोध सुरू झाली. परंतु बाळाचा थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर या घटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत एका आरोपीला अटक केली. त्यानंतर बाळाच्या शोधात एक पथक पाठविण्यात आले. वणी येथून २०० किमी अंतरावरुन पोलीस पथकाने बाळाला ताब्यात घेऊन त्याला आईच्या स्वाधीन केले. बाळाचे अपहरण करण्यामागे कोणता हेतू होता याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वणी येथील पत्रकार परिषदेमध्ये देणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments