Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री उध्दव ठाकरे 'या' कारणामुळे पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार नाहीत!

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ‘या’ कारणामुळे पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार नाहीत!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात Pune उपस्थित राहणार नाहीत. शिष्टाचारानुसार पंतप्रधानांचे स्वागत करायला मुख्यमंत्री हजर असतात. परंतु पंतप्रधान कमी वेळ थांबणार असल्यामुळे मुख्यमंत्री,राज्यपाल यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान कार्यालयाकडूनच कळविण्यात आले आहे.

मोदी आज देशात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या Coronavirus vaccine संशोधन कार्याचा आढावा घेणार आहेत. अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्याला मोदी या निमित्तानं धावती भेट देणार आहेत. पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटला Serum Institute मोदी दुपारी भेट देणार आहेत. तिथे ते कोरोना प्रतिबंधक Coronavirus लसीवर सुरू असलेल्या संशोधनाचा आढावा घेणार आहेत.

वाचा l राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं निधन

त्या आधी सकाळी मोदी अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक पार्क कंपनीला भेट दिली. अहमदाबादमधल्या चांगोदर औद्योगिक क्षेत्रातल्या झायडस कॅडिलाच्या प्रकल्पाला सकाळी साडे नऊ वाजता भेट दिली आहे. तिथे तासभर पाहणी केली.

झायडसची झायकोविड लसीची दुसऱ्या टप्प्यातली चाचणी सध्या सुरू आहे. त्यानंतर मोदी हैदराबादमधल्या भारत बायोटेकला दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला भेट देतील. भारत बायोटेकनं तयार केलेल्या लसीची सध्या तिसऱ्या टप्प्यातली चाचणी सुरू आहे. या ठिकाणी तासभर थांबून, मोदी पुण्याला येतील. पुण्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटला ते दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी भेट देणार आहेत. मोदी या ठिकाणी एक तास थांबून दिल्लीला परतणार आहेत.

वाचा l Vivo Y1s भारतात लाँच, किंमत फक्त 7,990 रुपये

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments