होम महाराष्ट्र व्हेलेंटाईन: कारागृहात महिला कैंद्याशी होणार चिमुकल्यांची भेट!

व्हेलेंटाईन: कारागृहात महिला कैंद्याशी होणार चिमुकल्यांची भेट!

9
0
शेयर

मुंबई – व्हेलेंटाईन डे च्या निमित्ताने आज मुंबईतील भायखळा महिला कारागृहासह राज्यातील इतर कारागृहात आगळावेगळा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधून कारागृहातील कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना खास करून महिला कैद्यांच्या लहान मुलांची भेट घडवण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी कैद्याकडून आतापर्यंत ५० अर्ज तुरुंग प्रशासनाकडे दाखल झाल्याने महिला कैद्यांची त्यांच्या मुलांसोबत भेट घडवून देण्यात येणार आहे. जिल्हा पर्यवेक्षिका, महिला व बालविकास विभाग, मुंबई आणि तुरुंग प्रशासनाने भायखळा तुरुंगात अनोख्या पद्धतीने व्हेलेंटाइन डे साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमादरम्यान १६ वर्षाखालील मुलांना त्यांच्या पालकांना भेटता येणार आहे. भायखळा तुरुंगात सध्या महिला आणि पुरुष असे ५१० कैदी शिक्षाधीन आहेत.
राज्यात ९ मध्यवर्ती कारागृहे ३१ जिल्हा कारागृहे आणि मुंबई, पुणे येथील महिलांकरता स्वतंत्र कारागृह आहेत. या कारागृहात महिला कैदी यांना त्यांच्या कुटुंबींयांना क्वचितच भेटायला येते. अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी ‘ कैद्यांची गळाभेट’ हा उपक्रम तुरुंगात सुरू केला आहे. गळाभेटी दरम्यान कैद्यांना त्यांच्या मुलांना समोरासमोर भेटण्याची मुभा देण्यात येते. आपल्या कुटुंबीयांच्या तासभर भेटीने खास करून लहान मुलांच्या भेटीने महिला कैद्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून येतो. तसेच या भेटीमुळे कैद्यांमधील नैराश्य  कमी होत असल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगितले जात आहे. चांगला उपक्रम असल्यामुळे समाजात चांगला पोहचेल असा विश्वास अधिकारी व्यक्त करीत आहेत.