साताऱ्यातील वेण्णा लेकला धरणाला गळती !

- Advertisement -

महत्वाचे…
१.भगदाड बुजवण्यासाठी परिसरातून जुने कपडे गोळा केले जात आहेत २. भगदाड बुजवण्यासाठी दोन ट्रक जुने कपडे ३. यापूर्वीही धरणाला लागली होती गळती


सातारा: साताऱ्यातील वेण्णालेक धरणाला भलमोठं भगदाड पडलं आहे. ही गळती थांबविण्यासाठी भगदाडात जुने कपडे कोंबण्याचा प्रयत्न रात्रीपासून सुरु आहे. त्यासाठी तब्बल दोन ट्रक जुने कपडे वापरण्यात आले. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. भगदाड बुजवण्यासाठी परिसरातून जुने कपडे गोळा केले जात आहेत. २५ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या वेण्णा लेक धरणावर कोट्यवधी रुपये खर्च करुनही असे भगदाड पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहेत.

- Advertisement -

यापूर्वीही वेण्णालेक धरणातून पाण्याची गळती सुरु होती. मात्र तेव्हा तात्पुरती डागडुजी करण्यात आली. आता पुन्हा एकदा धरणातून गळती सुरु झाली आहे. पर्यटकांचं आकर्षण असलेलं आणि महाबळेश्वर, पाचगणीसह सुमारे २५ गावांना पाणी पुरवठा करणारं वेण्णा लेकला मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. या विषयी ५ ऑक्टोबरला माहिती समोर आली होती. मात्र त्यावेळी संबंधित प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला. नाही म्हणायला महाबळेश्वर गिरिस्थानच्या मुख्याधिकारी अमिता पाटील यांनी वेण्णा लेकला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. २००१ मध्ये ५६ कोटी रुपये खर्चून वेण्णा लेक बांधण्यात आले आहे. तर चार वर्षापूर्वी आमदार फंडातून  तीन कोटी रुपये खर्चून या लेकची किरकोळ गळती बंद करण्यात आली होती. वेण्णा लेक हे सध्या महाबळेश्वर गिरीस्थान यांच्या ताब्यात आहे.

- Advertisement -