Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेनटसम्राटाला आज अखेरचा निरोप

नटसम्राटाला आज अखेरचा निरोप

shriram lagoo images

पुणे : ज्येष्ठ ख्यातनाम अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. लागू यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे ठेवण्यात आले होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नाना पाटेकर यांच्यासह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, विचारवंत, लेखक यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. रंगभूमीचा सारा अवकाश व्यापून सशक्त भूमिका उभी करणारे आणि चित्रपटाचा संपूर्ण पडदा आपल्या संवेदनशील आविष्काराने व्यापणारे ख्यातनाम अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी ९२ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ‘लागू यांचे चिरंजीव आनंद अमेरिकेत आहेत. ते आल्यानंतर गुरुवारी डॉक्टरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील,’ असे लागू कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, आनंद गुरुवारपर्यंत पुण्यात पोहचू शकत नसल्याने लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे लागू यांच्या पत्नी दीपा श्रीराम आणि कन्या डॉ. शुभांगी कानिटकर यांनी बुधवारी स्पष्ट केले होते. लागू यांचे पार्थिव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी आज शुक्रवारी मोठी गर्दी होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवारांनी हजेरी लावली होती. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments