Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeविदर्भनागपूरविदर्भ बंदच्या आंदोलनाला हिंसक वळण!

विदर्भ बंदच्या आंदोलनाला हिंसक वळण!

नागपूर: विधिमंडळाच्या  नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भ बंदचे आंदोलन  करण्यात येतं आहे. वेगळ्या विदर्भाच्या आंदोलना हिंसक वळण मिळालं आहे. जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. आंदोलनामुळे सरकारचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. विविध पक्ष,संघटनांनी याला पाठिंबा दर्शविला. दरवर्षी वेगळ्या विदर्भाची मागणी होती. सरकार या बाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर जवळ  गंगाभाई घाट परीसरात टायरची  जाळपोळ करण्यात आली आहे.   वर्धमान नगर इथे एसटीवर दगडफेक करण्यात आली आहे. या आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालयं बंद ठेवणे, व्यापारी प्रतिष्ठानं बंद राहावीत, यासाठी विविध संस्था संघटनांना विदर्भवादी नेत्यांनी आवाहन केलं होतं. त्याला अनेकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून विदर्भाच्या मुद्यावर काम करणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. विदर्भातील जनतेने स्वयंस्फुर्तीने या आंदोलनात सहभागी होऊन सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही विदर्भवाद्यांनी केलं होतं. विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ कनेक्ट, विदर्भ माझा, जनमंच, जनसुराज्य पार्टी तसेच आठवले, खोबाग्रडे, गवई आणि जोगेंद्र कवाडे यांच्या गटाच्या पक्षांनीही या बंदमध्ये सहभाग घेण्याचं ठरवलं आहे. स्वतंत्र विदर्भासह व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ११ डिसेंबर रोजी विदर्भ आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ बंदची हाक देण्यात आली होती.

विदर्भ राज्याचे लिखित आश्वासन देणाऱ्या भाजपाने विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात केला होता. वेगळ्या विदर्भासाठी सरकार उदासीन आहे. त्यामुळे आरपारच्या लढाईशिवाय पर्याय नसल्याचे वामनराव चटप यांनी रविवारी सांगितले होते. विदर्भाच्या मागणीला जनतेचा पाठिंबा नाही अशा भ्रमात असलेल्या भाजप सरकारला हे आंदोलन जागे करणारे ठरेल, असा दावा अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केला होता. विदर्भ राज्य आंदोलन समितीने सोमवारच्या बंदची हाक दिली होती. या आंदोलनास राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा, जनमंच, विदर्भ कनेक्ट, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रिपब्लिकन पार्टी (खोब्रागडे), भीमसेना, विदर्भ गण परिषद, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, माजी खासदार दत्ता मेघे यांची विदर्भ राज्य विकास परिषद, बहुजन सेना, बळीराजा पार्टी, झोपडपट्टी समस्या निवारण संघ, टायगर ऑटोरिक्षा संघटना, नाग-विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आदींचा पाठिंबा लाभला आहे. ठिकठिकाणी मेळावे, बैठका घेऊन सर्वसामान्यांना देखील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments