Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeविदर्भअकोलानुकसानग्रस्त पिकांचे बुधवारपर्यंत 100 टक्के पंचनामे करु : देवेंद्र फडणवीस

नुकसानग्रस्त पिकांचे बुधवारपर्यंत 100 टक्के पंचनामे करु : देवेंद्र फडणवीस

cm-devendra-fadnavisअकोला : अवकाळी पावसाचा महाराष्ट्रातील पिकांना फटका बसला आहे. त्याची पाहणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यात केली. बुधवार 6 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण करु. सरकार शेतक-यांच्या मदतीसाठी सज्ज आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

आज देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील अकोला जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी फडणवीसांनी सांगितले की, सरकारी पंचनाम्याच्या आधारावर नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत दिली जाईल. कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. सगळ्यांनाच मदत मिळेल. शेतक-यांना विम्याचा फायदा मिळणार आहे. विम्याच्या पावतीचा आग्रह धरु नका. असेही फडणवीस यांनी सांगितले.

मदतीसाठी सोपी पध्दत अवलंबणार आहे. मदतीची हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका फोटोवर मदत मिळेल. असे आश्वासन फडणवीस यांनी शेतक-यांना दिले. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतक-यांना मदत केली जाईल असेही फडणवीस यांनी शेतक-यांना सांगितले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments