Friday, March 29, 2024
Homeविदर्भअकोलाकाँग्रेसचे माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे निधन

काँग्रेसचे माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे निधन

Babasaheb Dhabekarअकोला : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जलसंधारण मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे आज मुंबईत निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. काही महिन्यांपासून ते आजारी होते. मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी ११.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा येथील घरी बुधवारी धाबेकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजेनंतर अंत्यसंस्कार करण्यात येतील. बाबासाहेब धाबेकर हे तीन वेळा आमदार झाले होते. ते राज्य परिवहनमंत्री आणि जलसंधारण मंत्रीही होते.

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा हे त्यांचे मूळ गाव. या गावातून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. धाबा गावातील ग्रामपंचायत सदस्य ते आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. ते धाबा गावात उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे सभापती झाले. यानंतर कारंजा मतदारसंघातून अपक्ष म्हणून ते विधानसभेवर निवडून गेले होते.

बाबासाहेब धाबेकर यांनी आमदार झाल्यानंतर शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर ते जलसंधारणमंत्री झाले. त्यांनी जलसंधारणाच्या कामांना गती दिली. तसंच सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments