Thursday, March 28, 2024
Homeविदर्भबुलडाणाकोरोना : चिखलीच्या ‘त्या' रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह!

कोरोना : चिखलीच्या ‘त्या’ रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह!

Coronavirus patients in Mumbai, coronavirus, mumbai coronavirus, maharashtra, uddhav thackerayबुलडाणा : सौदी अरेबियातून आलेला आणि करोनाचा संशयित म्हणून उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला असून त्याचा मृत्यू कोरोणामुळे झाला नसल्याचा स्पष्ट झाला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील एका वयोवृध्द रुग्णाला सर्दी व तापाची लक्षणे होती. मात्र कोरोनाच्या संशयित रुग्ण म्हणून बुलडाणा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात शनिवारी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी हा संशयित रुग्ण सौदी अरेबियातून आला होता. त्यांची मुंबई विमानतळावर तपासणीही करण्यात आली होती. मात्र, त्यांची प्रकृती चांगली वाटल्याने त्यांना त्यांच्या मूळगावी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, घरी आल्यावर त्यांना सर्दी, ताप आला. त्यामुळे ते खासगी रुग्णालयात गेले होते. तिथे डॉक्टरांना संशय बळावल्याने त्यांनी त्यांची रवानगी जिल्हा सामान्य रुग्णालयात केली. संबंधित रुग्णाचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. मात्र, रिपोर्ट येण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे खळबळ उडाली होती. आठवडी बाजारही बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. यासंबधी आज अधिकृत रिपोर्ट आला असून त्यात त्याला करोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कला रात्रीच या व्यक्तिवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले.

दरम्यान, बुलडाण्यात विदेशातून १२जण आलेले असून त्यांच्यावर प्रशासन वॉच ठेवून आहे. यातील तीन जणांना खामगाव येथील उपचार कक्षात ठेवण्यात आले असून ९ जणांवर देखरेख करण्यात येत असल्याचं पंडित यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात बारा विदेशी पाहुणे आपल्या नातेवाईकांकडे खामगाव येथे आले होते. यातील तीन जणांना खामगाव येथे उपचार कक्षात (विलीनीकरण कक्ष) ठेवण्यात आले असून नऊ जणांना बुलडाणा येथे निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. या पाहुण्यांना चौदा दिवस निगराणी खाली ठेवण्यात येणार असून कोरोनाचे गांभीर्य पाहता सर्वोतोपरी खबरदारी आरोग्य विभागाकडून ठेवण्यात आली असल्याचे पंडित म्हणाले. यामध्ये सात जण इंडोनेशिया आणि पाच जण मलेशिया येथून आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments