Placeholder canvas
Wednesday, April 17, 2024
Homeविदर्भगडचिरोलीजमिन खरेदी घोटाळा — ङ्गौजदारी गुन्हा दाखल करणार व एसआयटी स्थापन: रविंद्र...

जमिन खरेदी घोटाळा — ङ्गौजदारी गुन्हा दाखल करणार व एसआयटी स्थापन: रविंद्र वायकर

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठासाठी जमिन खरेदी प्रकरणी झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी ङ्गौजदारी गुन्हा दाखल करणार तसेच एसआयटी स्थापन करण्यात येईल, असे आश्‍वासन उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधान परिषदेत दिले.

गोंडवाना विद्यापीठासाठी अडपल्ली, ता. जि. गडचिरोली येथील ७८.१७ हेक्टर ही जमिन खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने एकूण रुपये ९२ कोटी १८ लाख १३ हजार ८२३ इतका  निधी मंजुर करण्यात आला. उपजिल्हाधिकारी तसेच विशेष भुसंपादन अधिकारी, गडचिरोली यांच्याकडून २७ मार्च २०१८ नुसार रुपये ७७ कोटी ८३ लाख २६ हजार ४५५ इतकी रक्कम जमिन खरेदी करण्यासाठी सर्वे निहाय मुल्यांकन पत्र प्राप्त झाले. विद्यापीठाने आजतागायत १४.१५ हे आर एवढी जमिन खरेदी केलेली असून रुपये १३ कोटी ३८ लाख ०९ हजार ९२६ एवढा निधी खर्च करण्यात आला. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी पार पडलेल्या अधिसभा बैठकीत डॉ. प्रमोद शंभरकर यांनी विद्यापीठासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमितीच्या दरात तङ्गावत असल्याबाबत शंका व्यक्त केली. ही तङ्गावत तपासण्यासाठी अधिसभेचे सदस्य होळी यांच्या अध्यक्षतेखाली समितीही गठीत करण्यात आली. समिती सदस्य प्राप्त कागदपत्रांचे अवलोकन करीत असतांना एका समिती सदस्यांनी विद्यापीठ अभियंता यांना (आरजी ०.८०) या जमिनीवरील इमारतीच्या क्षेत्रङ्गळाच्या मोजमापाची बेरीज करण्यास सांगितले. या इमारतीच्या क्षेत्रङ्गळाचे मोजमापांच्या बेरजेत चुक झाल्याचे लक्षात आल्यावर विद्यापीठ अभियंता यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांमार्ङ्गत कुलगुरुंच्या ही बाब निदर्शनास आणली. सहाय्यक जिल्हाधिकारी व विशेष भूसंपादन अधिकारी यांनी अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना जागेवरील ङ्गेरमुल्यांकन करून अहवाल सादर करण्यास सांगितले, अशी माहिती वायकर यांनी सभागृहाला दिली. कुलगुरूंच्या आदेशानुसार कुलसचिव यांनी पुढील कार्यवाहीसाठी भुसंपादन अधिकारी यांना सांगितले. विशेष भुसंपादन अधिकारी गडचिरोली यांनी अधिक्षक अभियंता सा. बां. विभाग गडचिरोली यांनी एकुण १.६० हेक्टर आर जागेवरील इमारतीचे ङ्गेरमुल्यांकन करुन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यास सांगितले. अधिक्षक अभियंता यांनी या जमिनीवरील ङ्गेरमुल्यांकन करुन सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी यापुर्वी प्राप्त मुल्यांकनात तङ्गावत असून सदर जमिनीचे ङ्गेरमुल्यांकन किंमत रुपये १ कोटी २२ लाख ०१ हजार ६८० इतकी असल्याचे नमुद केले. त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी यापुर्वी भुधारकास अदा करण्यात आलेली रक्कम व ङ्गेरमुल्यांकनाची रक्कम यातील तङ्गावत रुपये ६१ लाख १३ हजार ८७५ इतकी रक्कम विद्यापीठाच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री वायकर यांनी विधानपरिषदेत दिली. गोंडवाना विद्यापीठासाठी आवश्यक २०० एकर जागा आवश्यक होती. मात्र यासाठी खाजगी जमिनही उपलब्ध होत नव्हती. विद्यापीठासाठी आवश्यक जागेच्या उपलब्धतेसाठी राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली २०१६ मध्ये बैठकही घेण्यात आली होती.

या विद्यापीठासाठीच्या जमिन खरेदीतील गैरप्रकाराप्रश्‍नी विधानसभा सदस्य प्रा. अनिल सोले यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासावेळी प्रश्‍न उपस्थित केला.  याप्रश्‍नी ङ्गौजदारी गुन्हा दाखल करणार का? तसेच शासनामार्ङ्गत एसआयटी नेमणार का? असे प्रश्‍न विचारले. यात विधानसभा सदस्य ना. गो. गाणार, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेता धनंजय मुंडे यांनी देखील ङ्गौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठासाठी जमिन खरेदी करताना झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात येईल तसेच ङ्गौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येईल, असे आश्‍वासन सभागृहात दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments