Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भदहा खासदारांविरूद्धच्या याचिकांवर आज सुनावणी

दहा खासदारांविरूद्धच्या याचिकांवर आज सुनावणी

भाजपचे गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते व भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मुंढे यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

या याचिकांमधून मुख्य निवडणूक आयोगाला वगळण्यात यावे, अशी विनंती करणारा अर्ज निवणूक आयोगाच्यावतीने अॅड. निरजा चौबे यांनी दाखल केला आहे. त्यावर न्या. रोहीत देव यांच्या एकलपीठासमोर बुधवारी सुनावणी होणार आहे.

गडचिरोली व भंडारा-गोंदिया मतदार संघातील विजयी खासदारांच्या विरूध्द दाखल याचिकांवर सुनावणी करताना हायकोर्टाने मुख्य निवडणूक आयोग तसेच अशोक नेते व सुनील मेंढे यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. त्यावर चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे, कारू नान्हे यांनीही स्वतंत्र निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. त्यावरही आता सुनावणी होणार आहे. विदर्भातील सात पराभूत उमेदवारांनी निवडून आलेल्या दहा खासदारांच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्यावर विविध एकलपीठांसमोर आता सुनावणी होणार आहे. या निवडणूक याचिकांमध्ये मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन्समध्ये झालेला तांत्रिक बिघाड, अनेक मतदार संघात एकूण मतदान आणि मतमोजणीत आलेली तफावत यासारखे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments