Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeविदर्भनागपूरकोरोनाबाधीत व्यक्तीच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारला

कोरोनाबाधीत व्यक्तीच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारला

CoronaVirusनागपूर : कोरोनाने जगभरात थैमान घातला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला करोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आज सकाळी संबंधित व्यक्तीच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला आहे. दरम्यान, याच व्यक्तीचा मुलगा शहरातील एका कॉलेजमध्ये शिकत असून त्यालाही कॉलेजात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अमेरिकेहून परतलेली एक व्यक्ती करोनाबाधित असल्याचे बुधवारी रात्री स्पष्ट झाले. त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. दरम्यान, आज सकाळी संबंधित व्यक्तीची मुलगी शाळेत गेली तेव्हा तिला प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी नेमके कारण माहीत नसल्याने इतर पालकांनी शाळेला विनवणी सुरू केली. शाळा मानत नसल्याने पालक आक्रमकही झाले. अखेर संबंधित मुलीच्या वडिलांस करोना झाल्याचे शाळा प्रशासनाला स्पष्ट करावे लागले. त्यानंतर हुज्जत घालणाऱ्या पालकांनी माघार घेतली. याच करोनाग्रस्त रुग्णाचा मुलगा एका प्रतिष्ठित कॉलेजात आहे. त्यालाही प्रवेश बंदी करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

महाराष्ट्रात १ लाख ३८ हजार ९६८ प्रवाशांची तपासणी…

मुंबई, पुणे, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११ मार्चपर्यंत १,१९५ विमानांमधील १ लाख ३८ हजार ९६८ प्रवासी तपासण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments