Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeविदर्भनागपूरधनंजय मुंडेंनी शिवस्मारकाच्या चौकशीची केली मागणी

धनंजय मुंडेंनी शिवस्मारकाच्या चौकशीची केली मागणी

नागपूर : भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आली होती. तत्कालीन भाजप सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन केलेल्या शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार करण्याचे पाप केले. यामुळेच नियतीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले, या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली.

धनंजय मुंडे सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनांच्या प्रस्तावावर बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व धनंजय मुंडे आरोप प्रत्यारोप झाले. फडणवीसांनी तीन चाकी रिक्षा सारखे हे सरकार फार काळ टिकणार नाही असे म्हटले होते. त्याला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना तीन चाकांचे विमानही असते अशी आठवण करून देत तुम्हाला पुन्हा यायला ५ नाही तर १५ वर्ष वाट बघावी लागेल असे टोलाही लगावला.

पंतप्रधान मोदींना आणून गवगवा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही मुंडेंनी केली. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत तर देणारच आहे, सोबतच दिलेला प्रत्येक शब्द पाळण्यासाठी कटिबद्ध आहे असेही मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

भाजपच्या हातून नियतीने सत्ता हिरावून घेतली…

पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून फसवणूक तर केलीच परंतु ‘भीक नको पण कुत्रा आवर’ या म्हणीप्रमाणे शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला, म्हणूनच भाजपच्या हातून नियतीने सत्ता हिरावून घेतली असे परखड मतही मुंडेंनी बोलताना व्यक्त केले. दरम्यान विधानसभेत पहिल्याच भाषणात जोरदार बॅटिंग करत मुंडेंनी परळीच्या जनतेने ही संधी मिळवून दिली असल्याचे सांगून परळीच्या जनतेचे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments