Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeविदर्भनागपूर...तर मी ‘या’ पक्षात जाण्यास इच्छुक : एकनाथ खडसे

…तर मी ‘या’ पक्षात जाण्यास इच्छुक : एकनाथ खडसे

Don't trust on me Eknath Khadseनागपूर: भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या भाजपवर नाराज आहेत. खडसे नागपूरला तळ ठोकून बसले आहेत. खडसे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत आज नागपूरमध्ये पत्रकारांनी पक्ष प्रवेशाबाबत खडसेंना विचारले असता त्यांनी मी राष्ट्रवादीत नाही तर रामदास आठवलेंच्या ‘रिपाइं’मध्ये जाण्यास इच्छुक आहे. असे मजेशीर उत्तर दिले.

खडसेंचे भोसरी जमीन प्रकरणी मंत्रीपद गेले. विधानसभेमध्ये त्यांच तिकीट कापण्यात आलं. मुलगी रोहिणी खडसेचा पराभव करण्यात आला. भाजपच्या काही मंडळींनी विरोधात काम केल्याचा आरोप खडसेंनी केला. त्याबाबत पुराव्यासहित पक्षश्रेष्ठींकडे तक्रारही दिली. मात्र, अद्यापही त्याच्यावर कारवाई झाली नाही. खडसे दिल्लीदरबारी जाऊन आले. दिल्लीला गेले असतांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेटसुध्दा घेतली होती. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात खडसेंनी भाजपवर जोरदार टीका केली होती. मी पक्षात राहणार की नाही माझा काही भरवसा नाही. असं वक्तव्य केलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून खडसेंची पक्षविरोधी भूमिका आणि वक्तव्ये त्यामुळे ते भाजप सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. “मी राष्ट्रवादी नाही तर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) या पक्षात जाण्यास इच्छुक आहे. यासाठी मी रामदास आठवलेंकडून परवानगी घेणार आहे”, अशी उडवा उडवीची उत्तर खडसेंनी पत्रकारांना दिली.

एकनाथ खडसे आज 18 डिसेंबर रोजी नागपूर येथे शरद पवारांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती. यावर पत्रकारांनी खडसेंना विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर देत मी आठवलेंच्या पक्षात जाणार असल्याचे म्हटले. खडसेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, “मी कुणालाही भेटण्यास मोकळा आहे. राष्ट्रवादीमध्ये जाणार की नाही याबाबत निर्णय नाही”, असं वक्तव्य खडसेंनी काही दिवसांपूर्वी केले होते. दिल्लीतून परतल्यानंतर खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज खडसे पुन्हा पवारांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments