Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeविदर्भनागपूरकुख्यात गॅंगस्टर आंबेकरच्या बंगल्यावर मनपाने बुल्डोझर फिरवला

कुख्यात गॅंगस्टर आंबेकरच्या बंगल्यावर मनपाने बुल्डोझर फिरवला

Gangster Santosh Ambekar Bunglowनागपूर : नागपूर महापालिकेचे डॅशिंग आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकरचा अनधिकृत बंगला जमीनदोस्त केला आहे. आंबेकरला आतापर्यंत महापालिकेच्या अधिका-यांकडून अभय दिला जात होता. मात्र, मुंढेंनी धडक कारवाई केल्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहे.

तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासूनच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी सर्वात आधी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्तीचं महत्त्व सांगत कारवाईचा इशारा दिला. यानंतर त्यांनी आता शहरातील अनधिकृत कामाकडे आपला मोर्चा वळवला आहे.

इतवारीमध्ये होता बंगला….

गॅंगस्टर संतोष आंबेकरचा नागपूरमधील इतवारी अनाधिकृत बंगला होता. याबाबत नागपूर महानगरपालिकेने आंबेकरला कायदेशीर नोटीसही बजावली. मात्र, त्याने स्वतःहून अतिक्रमण हटवले नाही. यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित बंगला जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे मनपाच्या पथकाने आज धडक कारवाई करत हा बंगला पाडला.

याच बंगल्यातून हलवत होता सूत्र….

नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने थेट गॅंगस्टर संतोष आंबेकरचा अनधिकृत बंगला आज पाडण्यात आल्याने याची जोरदार चर्चा सुरु आहे. नागपूरचे महापौर संदिप जोशी आणि महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गॅंगस्टर संतोष आंबेकर आतापर्यंत याच बंगल्यातून आपली गॅंग चालवत होता. हा बंगला अनधिकृत असल्यानं मनपाने नोटीसंही बजावली होती, शेवटी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानं आज हा बंगला पाडण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments