नागपूर : करोना रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली!

- Advertisement -

India's first coronavirus death confirmed in Karnatakaनागपूर : करोना विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. नागपूरमध्ये आणखी दोघांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागपूरमधील करोना रुग्णांची संख्या ३वर पोहोचली दोन रुग्णांमध्ये नागपूरमध्ये सापडलेल्या पहिल्या करोना रुग्णाच्या पत्नीचा समावेश आहे. महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या १६वर पोहोचली आहे.

करोनाची लागण झालेले दोन्हीजण परदेशातून आलेले असल्याची माहिती समोर आली आहे. करोनाची लागण झालेले हे दोघेही पती-पत्नी आहेत. नागपूरमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्याच्याच पत्नीला आणि सहकाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान, मेयोमध्ये करोनाच्या सहा संशयितांवर उपचार सुरू आहेत. या व्यक्तींमध्ये बाधित रुग्णाचे आई-वडील, सासू-सासरे, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन मोलकरणी, दोन मित्र, ही व्यक्ती ज्या गाडीत बसून आली त्या टॅक्सीचा चालक, प्राथमिक उपचार करणारे फॅमिली फिजिशियन आणि गार्डनर आदींचा समावेश आहे.

नागपुरात करोनाची लागण झालेल्या एका रुग्णाच्या १२ नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर दोघांचे टेस्ट रिपोर्ट संध्याकाळी येणार आहेत, असं जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं.

- Advertisement -
- Advertisement -