Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeविदर्भनागपूरनागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या कामगारांना 10 कोटींचे सानुग्रह अनुदान

नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या कामगारांना 10 कोटींचे सानुग्रह अनुदान

नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या 1124 कामगारांना प्रत्येकी 88 हजार 968 रुपयांप्रमाणे एकूण 10 कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. खेळते भांडवल संपुष्टात आल्याने एप्रिल 1996 मध्ये ही सूतगिरणी अवसायनात काढण्यात आली होती. या सूतगिरणीची मे 2011 मध्ये नोंदणी रद्द करून तिची मालमत्ता वस्त्रोद्योग संचालनालयाच्या नियंत्रणात ठेवण्यात आली होती. गिरणीच्या मालकीच्या जमिनीपैकी काही जमिनीची शासनाने विक्री केली होती.

नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या (नोंदणी रद्द) 1124 कामगारांना काही अटी व शर्तींनुसार सानुग्रह अनुदान देण्याबाबत 5 मार्च 2019 रोजी शासन निर्णय काढण्यात आला होता. त्यानुसार कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यापूर्वी कामगार व कामगार संघटना कोणत्याही रक्कमेची मागणी करणार नाही किंवा याबाबत न्यायालयात कोणतीही याचिका किंवा अर्ज दाखल करणार नाही, अशा प्रकारचे बंधपत्र संबंधित कामगारांकडून घेण्यात यावे. तसेच याबाबत वेगवेगळ्या न्यायालयात प्रकरणे दाखल किंवा प्रलंबित असल्यास ती कामगारांनी तथा कामगार संघटनांनी प्रथम मागे घ्यावीत व नंतरच रक्कम अदा करण्यात यावी, अशी अट घालण्यात आली होती. मात्र, आजच्या निर्णयानुसार ही अट रद्द करण्यात येणार असून कामगारांना 10 कोटी ही रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून दिली जाणार आहे. त्यानंतर कामगारांना कोणतेही वेतन दिले जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments