Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeविदर्भनागपूरशेतकऱ्यांचे धान सुरक्षित ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था करा; भुजबळांचे आदेश

शेतकऱ्यांचे धान सुरक्षित ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था करा; भुजबळांचे आदेश

Senior NCP leader Chhagan Bhujbal admitted to hospitalनागपूर : विधान परिषदेत धान उत्पादन करणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान खरेदीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहाला संबोधित केले.

भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदीसंदर्भात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी भंडारा जिल्ह्यात १३ हजार ३३८ शेतकऱ्यांकडून ५ लाख १ हजार ८०४ क्विंटल धानाची खरेदी सरकारने केली आहे. या धान्याची आधारभूत किंमत ९१.०७ कोटी देणे असून यातील ९ हजार ७९० शेतकऱ्यांना ५४ हजार ६५ कोटी इतकी रक्कम देण्यात आली आहे. तसेच उर्वरित रक्कम लवकरात लवकर देण्याची प्रक्रिया सुरू आहे असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

लघु, मध्यम व मोठे शेतकरी अशी वर्गवारी प्रक्रिया पूर्ण होताच पुढील १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

तसेच शासनाकडून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहोत. शेतकऱ्याला अनेक सवलती देण्याचा प्रयत्न आहे. यातून कोणालाही वंचित ठेवण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे धान सुरक्षित ठेवण्यासाठी ताबडतोब भाडे तत्वावर गोदामाची व्यवस्था करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments