Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeविदर्भनागपूरगुलामगिरीत असताना जे चालत होतं ते आता चालणार नाही,भागवतांनी सुनावले!

गुलामगिरीत असताना जे चालत होतं ते आता चालणार नाही,भागवतांनी सुनावले!

Mohan Bhagwat,RSS,BJP,Shiv Sena,Bhagwat,Mohan
Image: PTI

नागपूर : दिल्ली हत्याकांडानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या देशात काहीही घडलं तरी त्याला आपणंच जबाबदार आहोत. गुलामगिरीत होतो, तेव्हा जे काही होत होतं ते आता चालणार नाही. नागरिक अनुशासन आणि सामाजिक अनुशासनाची सवय अशाच कार्यक्रमांमधून होत असते. असंही मोहन भागवत यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत नागपूरात सुरू असलेल्या नववर्ष २०२० कार्यक्रमात सामाजिक अनुशासनावर जोर देत म्हणाले, आता आपण स्वतंत्र झालो आहोत. आज आपल्या देशात आपलं राज्य आहे. राज्याचं स्वातंत्र्य टिकून राहावे आणि राज्य सुरळीतपणे सुरू राहावे यासाठी सामाजिक आणि नागरिक अनुशासन अत्यंत आवश्यक आहे.

स्वतंत्र भारताचे संविधान सादर करताना आंबेडकरांनी संसदेत दोन भाषणं केली होती. या भाषणांमध्ये त्यांनी ज्या बाबींचा उल्लेख केला होता ती हीच बाब आहे. भागवत पुढे म्हणाले, आपल्या देशात आता जे काही होईल त्याला आपणच जबाबदार असू. यासाठी आपण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बराच विचार करायला हवा. काही राहूल गेलं किंवा काही वर-खाली झालं तरी आता ब्रिटीशांना दोष देऊ शकत नाही.

आपल्या भाषणात त्यांनी भगिनी निवेदिता यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, यासंदर्भात स्वातंत्र्यापूर्वी भगिनी निवेदिता यांनी आपणा सर्वांना सतर्क केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार देशभक्तीची दैंनदिन जीवनातील अभिव्यक्ती नागरिकत्व अनुशासनाचे पालक करण्याची असते. आपल्या भाषणात मोहन भागवत यांनी आंबेडकरांच्या भाषणाचा उल्लेख केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments