Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeविदर्भवाशिमजिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढू: विनायक मेटे

जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढू: विनायक मेटे

Vinayak Meteवाशिम: शिवसंग्राम पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असून आम्ही भाजप सोबत आहोत. मात्र येत्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत युती झाली नाही तर राज्यातील होऊ घातलेल्या वाशिमसह पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर आहे. असे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यात कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असताना पत्रकार परिषदेत विनायक मेटेंनी ही माहिती दिली.

राज्यातील भाजपा सरकारने बार्टीच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ संस्थेची निर्मिती केली होती. त्यामुळे मराठ्यांच्या मुलांना नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण मिळणार होते. मात्र या सरकारने सारथी संस्थेला स्थगिती दिल्याने मराठा सुशिक्षित बेरोजगारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. असेही मेटे यावेळी म्हणाले.”

भगवानगडावर काल भाजप नेते पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली. पण दोघेही आपल्यावर अन्याय झालं असे बोलले होते. पंकजा मुंडे काय बोलल्या हे मला माहित नाही आणि त्यांच्यावर काय अन्याय काय झाला हे त्याच सांगू शकतात. त्यांच्यावर अन्याय काय झाला हे त्या काल भगवानगडावर सांगू शकल्या नाही. तर आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सांगत आहे. मात्र तो जाहीरपणे न सांगता नेत्यांना सांगतो आहे.” असेही मेटे यावेळी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments