यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसांची संचारबंदी

- Advertisement -
2-days-complete-curfew-in-yavatmal-district-essential-services-will-continue
2-days-complete-curfew-in-yavatmal-district-essential-services-will-continue

यवतमाळ: कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सदृश्य स्थिती जाहीर करण्यात आलीय. त्याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसांची संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आलीय. शनिवार 27 फेब्रुवारी ते सोमवारी 1 मार्चच्या सकाळी 9 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवेची दुकाने फक्त सुरू राहणार आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली

गेल्या दहा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यवताळमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला होता. आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी 27 फेब्रुवारी ते सोमवारी 1 मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीय. यवतमाळमध्ये कोरोनामुळे डिसेंबर महिन्यात 29 , जानेवारी महिन्यात 25 मृत्यू झाले होते. तर फेब्रुवारी महिन्यात मृत्यू दरात मोठी वाढ झाली आहे.

- Advertisement -

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या का वाढली?

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जर पाहिलं तर कोरोनाच्या रुग्णाचा आलेख वाढत आहे, त्याचे कारणे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, लग्न समारंभांमध्ये झालेली गर्दी, मास्क न वापरणे आधी नियम पायदळी तुडविल्याने हा आलेख वाढल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -