Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसंपूर्ण कर्जमाफीसाठी १२ तारखेला विधान भवनावर मोर्चा!

संपूर्ण कर्जमाफीसाठी १२ तारखेला विधान भवनावर मोर्चा!

Farmars Morcha

नाशिक: सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी असल्याचा निषेध करत नाशिक जिल्ह्यातले शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. नाशिक ते मुंबई असा हा विराट मोर्चा निघाला आहे. या मोर्चात  हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. हा मोर्चा सध्या ठाण्यात पोहचला असून सोमवारी १२ मार्चला हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे.

राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे असा आरोप किसान सभेने केला आहे. नाशिकपासून लाँगमार्च काढत सुरु झालेला हा मोर्चा १२ तारखेला म्हणजेच सोमवारी  विधान भवनावर धडकणार आहे. ३० हजारांपेक्षा जास्त शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. आस्मानी संकट आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आयुष्य संपवण्याचीही वेळ येते आहे. अशात जाहीर करण्यात आलेली कर्जमाफीही फसवी आहे. त्यामुळेच सरकारचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

शेतकरी कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात. शेतकऱ्यांना कोणत्याही अटी आणि शर्थींशिवाय कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला दीडपट हमीभावापेक्षा कमी भाव देऊ नये, स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारसींची अंमलबजावणी तातडीने करावी या आणि अशा मागण्या करत किसान सभेने विराट मोर्चा काढला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments