महाराष्ट्रातही विकास वेडा झालाः सचिन सावंत

- Advertisement -

मुंबई: राज्य सरकारच्या जाहिरातीत बँकॉक च्या रस्त्याचा फोटो दर्शवला गेला असल्याने गुजरात, मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही विकास वेडा झाला आहे. अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

राज्य सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सरकारकडून कोट्यवधी रूपयांच्या जाहिराती सुरु आहेत. मी लाभार्थी, होय हे माझं सरकार अशा टॅगलाईन वापरून या जाहिराती सुरु आहेत. मंत्रालयाच्या तळमजल्यावर लावलेल्या अशाच एका जाहिरातीत चक्क बँकॉकमधील फोटो वापरण्यात आला आहे. राज्यातील रस्त्यांची दुरावस्था पाहता, जाहिरातीमधील रस्ता महाराष्ट्रात कुठे दिसत नाही. त्यामुळे बँकॉकच महाराष्ट्रात आले आहे, असे सांगायला हे फसवणीस सरकार कमी करणार नाही.  नाहीतरी अमेरिकेतल्या रस्त्यापेक्षा मध्यप्रदेशातील रस्ते चांगले आहेत असा जावई शोध मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लावलाच आहे, भाजपच्या नेत्यांना खोटं बोलण्याचा आजार (Pathological  Lying)  जडला  असल्याची शक्यता नाकारता येत नाही असा टोला सावंत यांनी लगावला.

विकासकामांना कात्री लावून न केलेल्या कामांच्या जाहिरातीवर सरकार कोट्यवधी रूपयांचा खर्च  करित आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांना कोट्यवधींची कंत्राटे दिली जात आहेत. राज्य कर्जाच्या ओझ्याखाली बदलेले असताना अशा त-हेची उधळपट्टी संतापजनक आहे. सरकारची विश्वासार्हताच लयास गेली असल्याने कितीही मार्केटींग, जाहिरातबाजी करून अतिरंजीत चित्र उभे केले तरी जनतेचा विश्वास या टेलीब्रँड सरकारवर बसणार नाही असे सावंत म्हणाले.

- Advertisement -
- Advertisement -