Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रखासदार राजीव सातव मारहाण प्रकरणी हिंगोलीत तोडफोड

खासदार राजीव सातव मारहाण प्रकरणी हिंगोलीत तोडफोड

Rajiv Sawant, Hingoli, Maharashtra, MLA Rajiv Sawant

महत्वाचे…

१ औंढा नागनाथ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी बसची केली तोडफोड २. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला ३. गुजरातमध्ये काँग्रेस खासदार राजीव सातव यांना अटक व मारहाणीचे पडसाद, निषेध

हिंगोली : गुजरात निवडणुकीत झालेल्या वादाचा परिणाम राज्यातही पाहायला मिळत आहे. राजकोटमध्ये खासदार राजीव सातव यांना झालेल्या मारहाणीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते हिंगोलीत आक्रमक झाले आहेत. औंढा-नागनाथ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका बसची तोडफोड केली. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळत भाजपच्या कार्यालयाचीही तोडफोड केली.

हिंगोली हा खासदार राजीव सातव यांचा मतदार संघ आहे. गुजरातमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या भावाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या घराबाहेर काँग्रेसने निदर्शनं केली. निदर्शनं करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये खासदार राजीव सातव यांचाही समावेश होता.

राजीव सातव यांच्यासह काही कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली. सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली. राजकोट येथील रेया रोडवरील काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील राजगुरु यांचे भाऊ दीप राजगुरु यांच्यावर भाजपचं पोस्टर काढण्याच्या वादातून हल्ला झाला होता.

मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या घराबाहेरचे पोस्टर फाढण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आले. मात्र यावेळी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये हाणामारी झाली. दीप राजगुरु यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. दरम्यान, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये काही कार्यकर्ते जखमीही झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments