Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र बंदला हिंसक वळण; बसेसवर दगडफेक- बाचाबाची

महाराष्ट्र बंदला हिंसक वळण; बसेसवर दगडफेक- बाचाबाची


मुंबई : राष्ट्रीय नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या बंदला महाराष्ट्रात जोरदार समर्थन मिळालं आहे. काही ठिकाणी दगडफेक, बाचाबाची आणि शाब्दिक चकमकीच्या घटना घडल्या आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या आज शुक्रवार ( २३ जानेवारी ) च्या महाराष्ट्र बंदला सुमारे ३५ संघटनांनी पाठिंबा दिली आहे. मुंबईच्या चेंबूर, सोलापूरमध्ये येथे बसवर दगडफेक करण्यात आली. मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, भिवंडी, मालेगाव व राज्यात मोठ्या प्रमाणात बंदला प्रतिसाद मिळत आहे. रूग्णालय, मेडिकल स्टोअर सुरु आहेत. मात्र, काही ठिकाणी शाळा, महाविद्याये,बंद असून ब-याच ठिकाणी ऑटो रिक्षा, टॅक्सी बंद आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बंद शांततेत करण्याचे आवाहन केले असून, बंदला जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments