Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमतदारच या देशाला भाजपमुक्त करणार - अशोक चव्हाण

मतदारच या देशाला भाजपमुक्त करणार – अशोक चव्हाण

अहमदनगर : मतदारच या देशाला भाजपामुक्त करणार, हे फडणवीस सरकार नसून फसवणूक सरकार आहे. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. पुढे म्हणाले की,कर्जमाफी नाही, शेतमालाला हमीभाव नाही, शेतकऱ्यांनी जायचं कुठे हेच कळत नाही” या भाजप सरकारने राज्याला आणि देशाला देशोधडीला लावलंय.

काँग्रेसने आज अहमदनगरमध्ये पहिला जनआक्रोश मेळावा घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या नेतृत्वात हा मेळावा घेण्यात आला. काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश आणि राष्ट्रीय नेते गुलाबनबी आझाद या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या जनआक्रोश मेळाव्यात अपेक्षेप्रमाणेच सर्वच नेत्यांनी केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारवर सडकून टीका केली. चव्हाण पुढे म्हणाले की,भाजपाचा परतीचा प्रवास नांदेड पासुन सुरु झालाय, आता मतदारच या देशाला भाजपमुक्त करणार यात शंका नाही,  सोशल मिडीयावरुन सरकारविरोधात व्यक्त होणाऱ्या तरूणांना पोलिसांकडू दमबाजी केली जातेय. हा प्रकार म्हणजे एकप्रकारे तरुणांचा आवाज दाबण्याचाच प्रकार आहे,” जीएसटी चुकीच्या पद्धतीने राबवल्यामुळे व्यापारीही अस्वस्थ असल्याचंही चव्हाणांनी म्हटलंय. नोटबंदीचा निषेध म्हणून काँग्रेस ८ नोव्हेंबर हा काळा दिवस मानणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले, ” या मेळाव्यातून उद्याच्या परिवर्तनाचे बीज रोवले जाणार आहे कारण गेल्या तीन वर्षात भाजप सरकारने विकासाच्या नावाखाली जनतेची फक्त फसवणूकच केली आहे. गेल्या ८ नोव्हेंबरच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे राज्यातला शेतकरी, कामगार, आणि व्यापारीही उध्वस्त झालेत. गेल्या ३ वर्षात ९ हजार शेतकरी आत्महत्या झाल्या, २० हजार मुले कुपोषणाने मृत्यूमुखू पडली, तरीही हे सरकार नुसतचं जाहिरातबाजीत मश्गुल आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments