Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्र७३४ ग्रामपंचायतींसाठी २६ डिसेंबरला मतदान

७३४ ग्रामपंचायतींसाठी २६ डिसेंबरला मतदान

महत्वाचे…
१.१८ राज्यातील २७ जिल्ह्यांमधील ७३४ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी २६ डिसेंबर २०१७ रोजी मतदान २.नामनिर्देशनपत्रे ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१७ या कालावधीत दाखल करता येईल. ३. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १४ डिसेंबर २०१७ आहे.


मुंबई : १८ राज्यातील २७ जिल्ह्यांमधील ७३४ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी २६ डिसेंबर २०१७ रोजी मतदान होणार असून २७ डिसेंबर २०१७ रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध जाहीर केले.

जानेवारी आणि फेब्रुवारी २०१८ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१७ या कालावधीत दाखल करता येतील.  नामनिर्देशनपत्रांची छाननी १२ डिसेंबर २०१७ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १४ डिसेंबर २०१७ असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.

२६ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. परंतु गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये मतदानाची वेळ केवळ दुपारी ३ पर्यंत असेल. २७ डिसेंबर २०१७ रोजी मतमोजणी होईल.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- ३१, पालघर- ३९, रायगड- ११, रत्नागिरी- १०, सिंधुदुर्ग- १६, नाशिक- २, जळगाव- १००, नंदुरबार- १३, अहमदनगर- ६७, पुणे- ९९, सोलापूर- ६४, सातारा- १९, सांगली-५, कोल्हापूर- १२, औरंगाबाद- २, बीड- १६२, नांदेड- ४, परभणी- २, उस्मानाबाद- १, लातूर- ५, अमरावती- १३, अकोला- ३, वाशीम- २, बुलडाणा- ४३, वर्धा- 3, गोंदिया-२ आणि गडचिरोली- ४ एकूण- ७३४ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments