Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रकोल्हापूरअलमट्टीतून 182240, कोयनेतून 2100 तर राधानगरीतून 1400 क्युसेक विसर्ग

अलमट्टीतून 182240, कोयनेतून 2100 तर राधानगरीतून 1400 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : अलमट्टी धरणातून 182240, राधानगरी धरणामधून 1400 तर कोयना धरणामधून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज सकाळी 7 वाजता दिली.

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  7 वाजता 18.6 फूट असून, एकूण 8 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.14 टीएमसी पाणीसाठा आहे. तुळशी मोठा प्रकल्प, आज पहाटे 6 वाजता भरला आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- खडक कोगे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड असे एकूण 8 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या अलमट्टी धरणात 115.058  टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 100.07  टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.47  टीएमसी, वारणा 32.46 टीएमसी, दूधगंगा 24.36 टीएमसी, कासारी 2.74 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.60 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.48, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 18.6 फूट, सुर्वे 19.7 फूट, रुई 49.6 फूट, इचलकरंजी 53 फूट, तेरवाड 47.6 फूट, शिरोळ 40 फूट, नृसिंहवाडी 41 फूट, राजापूर 34  फूट तर नजीकच्या सांगली 11.10 फूट आणि अंकली  16.1 फूट अशी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments