Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रमिलिंद एकबोटेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

मिलिंद एकबोटेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Milind Ekbote,bhim koregaon,pune,hundu,dalit,sambhaji maharaj

पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात पोलीस कोठडीत असलेला समस्त हिंदु आघाडीचा कार्याध्यक्ष,भाजपाचा माजी नगरसेवक मिलिंद रमाकांत एकबोटे (वय ६१, रा. शिवाजीनगर) याला १४ दिवसांची न्यायालयान कोठडी सुनावण्यात आली आहे. एकबोटे याला पुणे सत्र न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. बुधवारी पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या अनुयायांवर हल्ला करण्यास चिथावणी दिल्याचा आरोप एकबोटेवर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी एकबोटेंना अटक केली होती. दरम्यान, १९ मार्चला त्याला विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलीस कोठडीसाठी चालविले होते. न्यायालयाच्या बाहेर पडताच दोन मिनिटाच्या कालावधीतच वकीलाच्या वेशात असलेल्या गनिमीकावा प्रतिष्ठानचा संस्थापक संजय वाघमारे याने एकबोटेंवर शाई फेक केली होती. याप्रकरणी वाघमारे याच्यासह तीन जणांना पोलीस २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments