Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रमोशी कचरा डेपोची आग विझेना!

मोशी कचरा डेपोची आग विझेना!

Moshi, Garbage Depot, Pimpri Chinchwadपिंपरी चिंचवड:  पिंपरी चिंचवड येथील मोशी कचरा डेपोला गुरूवारी लागलेली आग सोळा तास अजूनही धुमसते आहे. ही आग अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. विशेष म्हणजे कचरा डेपो ८० एकरात पसरलेला आहे. आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु आहे मात्र अद्यापही आग नियंत्रणात आली नाही.

ही आग लागली तेव्हा धुराचे लोट २ ते ३ किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. किरकोळ कारणाने लागलेल्या या आगीने नंतर रौद्ररुप धारण केले. ५० पेक्षा जास्त अग्निशामक बंबांनी ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पण अजूनही त्यांना यश आलेले नाही. आग धुमसते आहे त्यामुळे कंट्रोल बर्निंग आणि कुलिंगचे काम सुरु आहे अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मोशी कचरा डेपोला आग लागल्याचे अग्निशमन दलाला समजले. सुरुवातीला अग्निशमन दलाचे ६ बंब आणि पाच खासगी टँकर याद्वार आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरु होते. पण रात्रभर ही आग नियंत्रणात आली नाही. याआधी दहा वर्षांपूर्वीही अशीच घटना घडली होती. कचरा डेपो ८० एकरांच्या परिसरात आहे. त्यामुळे ही आग वाढतेच आहे. अग्निशमन दलाकडून ही आग नियंत्रणात आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहे. आसपासच्या परिसरातील नागरिक धुरामुळे त्रस्त झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments