Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेकाँग्रेस आमदार विश्वजीत कदम अपघातात बचावले

काँग्रेस आमदार विश्वजीत कदम अपघातात बचावले

Congress MLA Vishwajeet Kadam survived the car accident
पुणे : सांगलीतील पलुस कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजीत कदम कार अपघातातून थोडक्यात बचावले. कदम हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. मुंबईहून पुण्याकडे जातअसतांना कदम यांच्या गाडीला मोठा अपघात झाला. मात्र, कदम सुखरुप आहेत.

विश्वजीत कदम हे मुंबईहून पुण्यात येत असताना रात्री हा अपघात झाला. मात्र, एअर बॅगमुळे विश्वजीत कदम बचावले. परंतु गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र विश्वजीत कदम यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. अपघातानंतर विश्वजीत कदम कराडच्या दिशेने निघाले. तेथे आज गुरुवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments