Thursday, March 28, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेमहाराष्ट्रावर पाच दिवस पावसाचे सावट

महाराष्ट्रावर पाच दिवस पावसाचे सावट

Rainपुणे : महाराष्ट्रावर पावसाचे सावट असून, मतमोजणी आणि विजयी उमेदवारांच्या जल्लोषवरही पावसाचं सावट आहे. त्याचबरोबर दिवाळीतही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी दोन दिवस, तर काही ठिकाणी पाच दिवस पावसाचा अंदाज आहे.
राज्यात कोकण गोवा, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, गोव्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रात अहमदनगर आणि पुण्यामध्ये मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस पाऊस पडेल, असं हवामान विभागाने म्हटलंय. त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा आणि सोलापुरात दोन दिवस जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल. विदर्भात मंगळवारी आणि बुधवारी कमी पाऊस आहे. मात्र गुरुवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments