पुणे हादरलं; 14 वर्षाच्या मुलीवर गँगरेप, सात जणांना अटक

- Advertisement -
gangrape-of-a-14-year-old-girl-who-came-for-a-birthday-party-at-pune
gangrape-of-a-14-year-old-girl-who-came-for-a-birthday-party-at-pune

पुणे:  14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादाय प्रकार पुण्यात घडला आहे. आपल्या आणखी दोन मित्रांना बोलावून त्यांनाही तुझ्यासोबर शारिरीक संबंध ठेवायचे असल्याने सांगून गोळीबार केल्याचा प्रकारही समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने यातील एक आरोपी श्रीकांत काळे याला पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केल्यानंतर, चौकशीत 15 दिवसांपूर्वी झालेला सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी जनता वसाहतीत राहणार्‍या 14 वर्षाच्या मुलीने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी यातील 5 जणांना ताब्यात घेतले असून दोघांना अटक केली. कृष्णा ऊर्फ रोहन अशोक ओव्हाळ (वय २४, रा.), निरंजन ऊर्फ निलेश शिंदे (वय २०, रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  या प्रकारामुळे पुणे परिसर हादरुन गेला आहे. 15 दिवसापूर्वी झालेली ही थरारक घटना आता उघडकीस आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

- Advertisement -

15 दिवसापूर्वी  आरोपींनी पीडित मुलीला वाढदिवसासाठी बोलावलं होतं. वाढदिवसानिमित्त पार्टी असल्याचं सांगून 14 वर्षीय मुलीला बोलावलं. यावेळी आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. नराधम यावरच थांबले नाहीत, त्यांनी आणखी दोन मित्रांना तुझ्यासोबर शारिरीक संबंध ठेवायचे असल्याचे सांगितले. पीडितेने या सर्वप्रकाराला विरोध केल्यानंतर, आरोपींनी चक्क गोळीबार केला.

याप्रकरणात पुणे गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने यातील एक आरोपी श्रीकांत काळे याला पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याची अधिक चौकशी केल्यानंतर 15 दिवसांपूर्वी झालेला सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. जनता वसाहतीत राहणार्‍या 14 वर्षाच्या मुलीने दत्तवाडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन 5 जणांना ताब्यात घेऊन, त्यापैकी दोघांना अटक केली आहे. कृष्णा ऊर्फ रोहन अशोक ओव्हाळ (वय २४, रा.), निरंजन ऊर्फ निलेश शिंदे (वय २०, रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here