Friday, March 29, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेपुण्यात पावसाचा धुमाकूळ; नऊ जणांचा मृत्यू

पुण्यात पावसाचा धुमाकूळ; नऊ जणांचा मृत्यू

Pune Rains Wall Collapse,pune wall collapse,wall collapse,pune rains,pune,maharashtra floodsपुणे शहर व जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून, शहरातील बरेचसे रस्ते, सोसायट्या जलमय झाल्या असून घरांमध्य पाणी शिरलं आहे. वाहने, जनावरे वाहून गेली आहेत. असून नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवार 26 सप्टेंबर 2019 रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

पुण्यात काल रात्री आठ वाजल्यापासून पावसाने जोर धरला. मुसळधार पावसामुळे शहरातील सर्वच भागातील रस्ते जलमय झाले. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. रस्त्यावरच्या पाण्यात अनेकांच्या गाड्या बंद पडल्या आहेत. महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी काळजी करु नये आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कुणाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असं आवाहन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलं आहे.

अरणेश्वर, टांगेवाली कॉलनी परिसरात दोन महिला, पुरुष आणि एका लहान मुलाचा मृतदेह आढळला आहे. 13 वर्षीय रोहित भरत आमले, 55 वर्षीय संतोष कदम, 32 वर्षीय सौंदलीकर (महिला) आणि त्यांचा 9 वर्षांचा मुलगा यांचा मृत्यू झाला आहे. तर सिंहगड परिसरात कारमध्ये दत्तात्रय गिरमे यांचा मृतदेह आढळला.

शिवाजीनगरमधील सिमला ऑफिस चौकामध्ये मुसळधार पावसामध्ये स्विफ्ट आणि एका रिक्षावर झाड पडून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर दोघांची प्रकृती ठीक आहे. जखमींना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पुणे शहरातील विविध भागांमध्ये पाण्याची भयावह स्थिती झाली आहे. यामध्ये वारजे ब्रिजखाली पाणी शिरल्यामुळे वारजे ते कोथरुड रस्ता बंद झाला आहे. सहकारनगर तळजाईला जाणारा रस्ता नाला फुटल्यामुळे ब्लॉक झाला आहे. गजानन महाराज मठापासून पुढे भरपूर पाणी साचल्यामुळे गाड्या वाहून गेल्या आहेत.कोल्हेवाडी परिसरात दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आलंय. पेठामध्ये रस्त्यावर जागोजागी पाणी साचलं आहे. तसेच सोसायटीमध्ये पाणी जमा झाले आहे.

बाणेर रस्त्यावर सिंध सोसायटीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पाण्यातून चारचाकी गाड्याही बंद पडत आहेत. दांडेकर पूल झोपडपट्टीत आंबील ओढ्यातून आलेले पाणी शिरलं आहे, पोलीस पाण्यात उतरुन नागरिकांना घरातून सुरक्षित बाहेर काढत आहेत. बालाजीनगर, संतोषनगर, कात्रज, आंबेगाव खुर्द अत्यंत गंभीर परिस्थिती, कात्रज बोगदा परिसर दरड कोसळली, आनेक ठिकाणी गाड्या वाहून गेल्या, पहिल्या मजल्या पर्यंत पाणी भरले आहे.

दांडेकर वस्ती, आंबील ओढा परिसरातील घरात पाणी शिरल्यामुळे तेथील रहिवाशांना राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले कला मंदिरात हलवण्यात आलं.  कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची भिंत कोसळली.सिंहगड रोडवरच्या नवले हॉस्पिटलमध्ये पाणी शिरले, पहिला मजला पाण्यात गेला आहे. नागरिकांच्या बचावासाठी एनडीआरएफची टीम दाखल झाल्या असून नागरिकामंध्ये भीती निर्माण झाली आहे.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहेत. सर्व मदत यंत्रणा तयार आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असेही पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments