Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेपुण्यात काँग्रेसच्या पदाधिका-यांनी भाजपचा झेंडा घेतला हाती

पुण्यात काँग्रेसच्या पदाधिका-यांनी भाजपचा झेंडा घेतला हाती

pune congree bjp
पुणे : सर्वच पक्षांमध्ये आयाराम गयारामांची खेळ सुरु आहे. मतदानाला अवघे 11 दिवस उरले आहेत. तरी सुध्दा पक्षांतर सुरुच आहे. पुण्यात काँग्रेसच्या आजी माजी पदाधिका-यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला. यामुळे काँग्रेसला धक्का बसला.

पुण्याचे माजी महापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, माजी स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब रानवडे यांच्यासह अनेकांनी कमळ हाती घेतलं. माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करत काँग्रेसला आणखी एक धक्का दिला. यामुळे सर्वच पक्षांना नाराज पदाधिकारी,कार्यकर्ते धक्के पे धक्के देत कोलांटउड्या मारत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments