Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रपुण्यात लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन जवानांचा मृत्यू

पुण्यात लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन जवानांचा मृत्यू

College of Military Enginnering Puneपुणे : पुण्यातील दोपोडी येथील मिलिटरी इंजिनिअरींग महाविद्यालयात (सीएमई) पूल बांधणीच्या सरावादरम्यान अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला. तर नऊ जवान गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना खडकी येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. हि घटना घटना गुरुवारी घडली. या घटनेत एकूण नऊ जवान जखमी झाले आहेत. सीएमई किंवा लष्करातर्फे अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, लष्करी सूत्रांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. सर्व जखमींना खडकी येथील लष्करी दवाखान्यात हलविण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञांचे पथक उपचार करत आहे.

आज गुरूवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास जवान बॅली सस्पेन्शन ब्रिज लाँच करण्याचे प्रशिक्षण केले जात होते. या दरम्यान एका बाजुच्या ब्रिजचा टॉवर पडला. या दुर्घटनेत एकूण नऊ जवान जखमी झाले आहेत. तर दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (सीएमई) भारतीय लष्कराचे इंजिनिअर्सचे एक प्रमुख तांत्रिक आणि सामरिक प्रशिक्षण संस्था आहे. यात कॉम्बॅट इंजिनिअर, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विस, बॉर्डर रेड्स इंजिनिअरिंग सर्विस (BRES) आणि सर्वे या सर्वांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments