Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeक्रीडापैलवान हर्षवर्धन सदगीर 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी

पैलवान हर्षवर्धन सदगीर ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी

Harshwardhan Sadgir Maharashtra,Harshwardhan, Sadgir, Maharashtraपुणे : नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. हर्षवर्धनने लातूरच्या शैलेश शेळकेचा ३-२ असा पराभव करुन, महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. या विजयानंतर हर्षवर्धन सदगीरने उपविजेता शैलेश शेळकेला खांद्यावर घेऊन, खिलाडूवृत्ती दाखवत मैत्रीचं दर्शन घडवलं.

दोन्ही मल्ल हे काका पवार यांच्या तालमीतील आहेत. त्यामुळे वस्ताद काका पवार यांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. विजयी हर्षवर्धन सदगीरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा देण्यात आली. हर्षवर्धन सदगीर ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीचा मानकरी ठरला.

लातूरच्या शैलेश शेळके आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या काका पवारांच्या दोन्ही पठ्ठ्यांनी फायनलमध्ये धडक मारली. या दोघांमध्ये मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्यात लढत झाली. गतवर्षीचा विजेता बाला रफिक शेख आणि उपविजेता अभिजीत कटके या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे महाराष्ट्राला यंदा नवा महाराष्ट्र केसरी मिळणार हे निश्चित होतं.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत लातूरचा शैलेश शेळकेने माती विभागात सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेवर ११-१० अशा अटीतटीच्या गुणसंख्येने विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली. तर नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने मॅट विभागात गतवेळचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेला ५-२ ने पराभूत केलं. विशेष म्हणजे शैलेश आणि हर्षवर्धन हे पुण्याच्या काका पवार यांच्या तालमीचे मल्ल आहेत. या दोघांनीही पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात एकत्रच सराव केला आहे. त्यामुळे यंदाची मानाची गदा काका पवार यांच्या तालमीत जाणार हे नक्की होतं.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत थरारक निकाल पाहायला मिळाले. गतवर्षीचा विजेता महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याला माऊली जमदाडेने चितपट केलं. मग माऊली आणि शैलेश शेळकेची फायनलमध्ये पोहोचण्यासाठी लढत झाली. त्यामध्ये शैलेश शेळकेने बाजी मारली.

तिकडे हर्षवर्धन सदगीरने मॅट विभागात गतवेळचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेला हरवून, आधीच फायनलमध्ये धडक दिली होती. दोन्ही मल्ल पहिल्यांदाच फायनलमध्ये दाखल झाल्याने, फायनल चुरशीची होईल अशी आशा कुस्तीचाहत्यांना होती. अखेर हर्षवर्धनने बाजी मारली.

हर्षवर्धन सदगीर बद्दल जाणून घेऊ या…

  • नाशिकचा मल्ल
  • वडील शाळेत क्लार्क
  • सुरुवातीला नाशिकच्या बलकवडे आखाड्यात मग पुण्यात काका पवारांकडे कुस्तीचे धडे
  • ग्रिकोरोमणचा राष्ट्रीय विजेता
  • मॅटवरच्या कुस्तीचा तगडा अनुभव
  • आक्रमक खेळाडू म्हणून ओळख
  • पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक
  • शैलेश शेळके
  • मूळचा लातूरचा मल्ल
  • शेतकरी पुत्र,घरातच वडिलांनी कुस्तीचे धडे दिले
  • सध्या सेना दलात नोकरीला
  • 3 वर्षापूर्वी काका पवारांच्या तालमीत दाखल
  • गतवर्षी मॅट विभागात पराभूत,यंदा माती विभागात नशीब आजमावलं.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments